GATE 2023 | या दिवशी सुरू होणार नोंदणी; परीक्षेच्याही तारखा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GATE 2023

GATE 2023 : या दिवशी सुरू होणार नोंदणी; परीक्षेच्याही तारखा जाहीर

मुंबई : अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणी/GATE 2023ची तारीख घोषित करण्यात आली आहे. भारतीय प्रौद्योगिकी संस्था कानपूरचे (IIT Kanpur) संचालक अभय करंदीकर यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. यावेळी आयआयटी कानपूरतर्फे गेट २०२३ चे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: CUET 2022 : विद्यापीठ प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी हे करा

महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या

गेट २०२३साठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. ४, ५, ११ आणि १२ फेब्रुवारी २०२३ रोजी ही परीक्षा घेतली जाईल. त्याचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच gate.iitk.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

हेही वाचा: CUET 2022 : परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

परीक्षा CBT मोडमध्ये असेल

अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी सीबीटी पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा २९ विषय क्षेत्रांत आयोजित केली जाईल. यापैकी काही ठिकाणी विद्यार्थ्यांना दोन विषय निवडण्याची सुविधाही दिली जाणार आहे. आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी कानपूर, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास, आयआयटी रुरकी आणि आयआयएससी बंगलोर यांनी संयुक्तपणे ही परीक्षा आयोजित केली आहे.

GATE परीक्षा महत्त्वाची का आहे ?

कला आणि विज्ञानाच्या विविध शाखांमधील डॉक्टरेट प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा शिक्षण मंत्रालयाद्वारे समर्थित संस्थांमधील अभियांत्रिकी/तंत्रज्ञान/आर्किटेक्चरमधील पीजी प्रोग्राम्समध्ये आर्थिक सहाय्यासाठी GATE स्कोअर उपयुक्त आहे. ही परीक्षा अभियांत्रिकी, विज्ञान, मानव्य आणि सामाजिक विज्ञान या विविध पदवीपूर्व विषयांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वसमावेशक आकलनाची चाचणी घेईल.

Web Title: Gate 2023 Registration To Start On This Day Exam Dates Also Announced

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Engineering
go to top