नियोजनबद्ध अभ्यासाला मेहनतीची जोड देत गिरीश वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नामध्ये सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला.
राजापूर : चार्टर्ड अकाउटंट (Chartered Accountant) होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी फाउंडेशन कोर्सला प्रवेश; मात्र, कोरोना महामारीत ऑनलाईन वर्ग, गावात पुरेसा मोबाईल रेंजचा अभाव आणि इंटरनेट नसल्यामुळे अभ्यास करणे कठीण झाले होते. या प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता नियोजनबद्ध अभ्यासावर भर देत तालुक्यातील भालावली येथील गिरीश हळदवणेकर (Girish Haldavanekar) याने पहिल्या प्रयत्नात चार्टर्ड अकाउटंटच्या (CA) परीक्षेत यश मिळवले.