Home Guard Recruitmentesakal
एज्युकेशन जॉब्स
Home Guard Recruitment : 'राज्यात होमगार्डची तब्बल दहा हजार रिक्त पदे भरणार'; मानधनात वाढ करण्याचाही प्रस्ताव
Home Guard Recruitment : पुण्यासह राज्याच्या नागरी संरक्षण दलात (होमगार्ड) दहा हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
Summary
पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून होमगार्ड कर्तव्य बजावत असतात. त्यांना बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या दिवसाचे केवळ ५७० रुपये मानधन दिले जाते.
पुणे : पुण्यासह राज्याच्या नागरी संरक्षण दलात (होमगार्ड) दहा हजार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबतची जिल्हानिहाय भरती (Home Guard Recruitment) प्रक्रिया सुरू झाली असून, येत्या डिसेंबरपर्यंत हे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दहा हजार महिला-पुरुषांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान, होमगार्डच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्तावही राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे विचाराधीन आहे.