Government job : सीमा रस्ता संघटनेत ३२७ जागांवर भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BRO

Government job : सीमा रस्ता संघटनेत ३२७ जागांवर भरती

मुंबई : बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. यासाठी BRO ने MTS सह इतर अनेक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार BRO च्या अधिकृत वेबसाइट bro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर आहे. (BRO Recruitment 2022)

हेही वाचा: Government job : १०वी उत्तीर्ण, ITI पात्रताधारकांसाठी नोकरीची संधी

याशिवाय, उमेदवार https://www.bro.gov.in/ या लिंकद्वारे या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 327 पदे भरली जातील.

महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 नोव्हेंबर

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदांची संख्या – ३२७

ड्राफ्ट्समन : १६ पदे

ऑपरेटर (संप्रेषण) : 46 पदे

इलेक्ट्रिशियन : 43 पदे

मल्टी स्किल्ड वर्कर (ब्लॅक स्मिथ) : 27 पदे

मल्टी स्किल्ड वर्कर (कुक) : १३३ पदे

हेही वाचा: Government job : ONGCमध्ये पदवीधरांना नोकरीची संधी; पगार ६० हजार

पर्यवेक्षक (प्रशासन) : 7 पदे

पर्यवेक्षक स्टोअर : 13 पदे

पर्यवेक्षक सिफर : 9 पदे

हिंदी टायपिस्ट : 10 पदे

वेल्डर : 24 पदे

पात्रता निकष

अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता उमेदवारांकडे असावी.

उमेदवारांनी अर्ज भरून O कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे - 411 015 येथे पाठवावा.