Government job | AIIMSमध्ये वरिष्ठ निवासी पदांवर भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government job

Government job : AIIMSमध्ये वरिष्ठ निवासी पदांवर भरती

मुंबई : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने वरिष्ठ निवासी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. MD, MS, DNB ची पात्रता असलेले उमेदवार aiimsguwahati.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑफलाइन फॉर्म डाउनलोड करू शकतात.

या भरतीद्वारे वरिष्ठ निवासी 40 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२२ आहे. (AIIMS Recruitment 2022)

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - ४०

वय मर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील लोकांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून एमडी, एमएस, डीएनबी उत्तीर्ण केलेले असावे.

निवड प्रक्रिया

वरिष्ठ निवासी पदांवर निवड होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन टप्प्यांतून जावे लागेल. प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल आणि यशस्वी उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीला उपस्थित राहण्याची संधी दिली जाईल.

पगार

निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ६७ हजार ७०० रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज कुठे करायचा ?

उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करणे आवश्यक आहे. फॉर्म भरा आणि कार्यकारी संचालक, AIIMS, कामरूप, आसाम - 781101 वर पाठवा.

अर्ज फी

अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 1500 रुपये भरावे लागतील. तर SC, ST आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना 1200 रुपये शुल्क भरावे लागेल.

Web Title: Government Job Recruitment For Senior Resident Posts In Aiims

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AIIMSGovernment Jobs