Government job | या बँकेत विविध पदांवर परीक्षेविना भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

central bank of india

Government job : या बँकेत विविध पदांवर परीक्षेविना भरती

मुंबई : सरकारी नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी बँकेत नोकरीची मोठी संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट श्रेणी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. सीबीआयने एक्सपिरियन्स प्रोफेशनलसाठी भरती जाहीर केली आहे.

यामध्ये IT, Economist, Data Scientist, Risk Manager, IT SOC विश्लेषक, IT सुरक्षा विश्लेषक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), क्रेडिट अधिकारी, डेटा अभियंता, कायदा अधिकारी, सुरक्षा आणि आर्थिक विश्लेषक यांचा समावेश आहे.

एकूण 110 पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.

हेही वाचा: Government job : १८ वर्षे पूर्ण असल्यास BARCमध्ये नोकरीची संधी; पगार ५० हजार

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख - 28 सप्टेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ ऑक्टोबर २०२२

मुलाखतीची तारीख - डिसेंबर २०२२

मुलाखत प्रवेशपत्र जाहीर करणे - नोव्हेंबर 2022

एकूण पदांची संख्या - 110 पदे

हेही वाचा: Work from home : सरकारी योजनेंतर्गत काम करा आणि घरबसल्या कमवा २० हजार रुपये

पात्रता

वेगवेगळ्या पदांसाठी विविध पात्रता विहित करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

SC/ST/PWBD उमेदवारांसाठी अर्जाची फी रु. 175 आहे आणि इतर सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी रु 850 आहे.

अर्जा कसा करावा ?

१. - सर्वप्रथम Centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

२. - आता तिथे Recruitments वर क्लिक करा.

३. - Recruitment of Officers in specialist category- 2022-23 – Residual Vacancy in various streams वरील अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करा.

४. - यानंतर नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा.

५. - आता सर्व माहिती भरा.

६. - त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा.

७. - आता अर्ज फी सबमिट करा.

८. - सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.