Government Job | १२वी उत्तीर्ण आणि पदवीधरांना EPFOमध्ये सरकारी नोकरीची संधी Government Job recruitment in EPFO job for graduates and 12th pass | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

EPFO

Government Job : १२वी उत्तीर्ण आणि पदवीधरांना EPFOमध्ये सरकारी नोकरीची संधी

मुंबई : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) हजारो पदांसाठी बंपर भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे SSO आणि स्टेनोग्राफरच्या एकूण २,८५९ जागा भरण्यात येणार आहेत. (Government Job recruitment in EPFO job for graduates and 12th pass )

या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला EPFO ​​अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज सुरू केल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. (EPFO Vacancy 2023) हेही वाचा - नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

रिक्त जागांचा तपशील

EPFO स्टेनोग्राफर भरतीद्वारे एकूण २ हजार ८५९ पदे भरली जातील. या पदांमध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यकाच्या २ हजार ६७४ पदे आणि स्टेनोग्राफरच्या १८५ पदांचा समावेश आहे.

महत्त्वाची तारीख

या पदांसाठी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया २७ मार्च २०२३ पासून सुरू होईल आणि उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २६ एप्रिल २०२३ पर्यंत वेळ देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

अर्ज भरणाऱ्या सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. ७०० दिले जातील. एससी, एसटी आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

निवड प्रक्रिया

या पदांवर निवड होण्यासाठी, उमेदवारांना फेज १ आणि फेज २ परीक्षा द्यावी लागेल.

टॅग्स :EPFOGovernment Jobs