खुशखबर! यूपी सरकार देणार 22 हजारांहून अधिक सरकारी नोकऱ्या

Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Summary

सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

UP Govt Jobs, UPSSSC Recruitment 2021 Notification : सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उत्तर प्रदेश सरकार लवकरच विविध विभागांत 22 हजारांहून अधिक पदांची भरती करणार आहे. दरम्यान, UPSSSC भरतीचे Notification अधिकृत वेबसाइटवर कधीही जारी केले जाऊ शकते.

यूपीमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. 12 वी पास ते पदवीधर उमेदवार या भरती मोहिमेत सहभागी असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी उत्तर प्रदेश सेवा निवड आयोगाच्या (UPSSSC) upsssc.gov.in अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे.

Yogi Adityanath
ITBP मध्ये मेडिकल ऑफिसर पदासाठी सरकारी नोकरी

पाच टप्प्यात ग्रुप 'C' पदांची भरती

यूपी सरकार 50000 गट C पदांची पाच टप्प्यात भरती करणार आहे. याबाबत आयोगाचे (UPSSSC) अध्यक्ष प्रवीर कुमार यांनी संबंधित सदस्यांची बैठक घेतलीय. आयोग लवकरच भरतीसाठी सुधारित परीक्षेच्या तारखा जाहीर करेल. पहिल्या टप्प्यातील भरती परीक्षा जानेवारी ते फेब्रुवारी 2022 मध्ये घेतली जाऊ शकते.

Yogi Adityanath
AAI मध्ये नोकरीची मोठी संधी; 'इतका' मिळणार पगार

रिक्त जागांचा तपशील

यूपीमध्ये ग्रुप 'C' पदांवर 50 हजारांहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, त्यापैकी एकूण 22794 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. एका अहवालानुसार, UPSSSC दिवाळीनंतर कधीही भरतीची अधिसूचना जारी करू शकते. यामध्ये महसूल लेखापाल म्हणजेच, लेखपालची 7882 पदे, आरोग्य सेविका 9212 पदे, कृषी तांत्रिक व ऊस पर्यवेक्षक अर्थात ऊस पर्यवेक्षकाची 2500 पदे, कनिष्ठ सहाय्यक व लघुलेखक यांची 2000 पदे आणि लॅब-टेक्नीशियन व एक्स-रे टेक्नीशियनची 1200 पदे भरण्यात येणार आहेत.

Yogi Adityanath
महाराष्ट्राच्या कन्येचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com