
Government Schemes for Safe Motherhood: दरवर्षी १० जुलै रोजी 'मातृ सुरक्षा दिन' जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक काळ असतो. या काळात आई आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्वोच्च गरज असते. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत आणि त्यानंतरच्या काळात योग्य काळजी न घेणे या दोघांसाठीही जोखमीचे कारण बनू शकते.