१२वी पास झालेल्यांसाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांत बंपर भर्ती! मिळणार आकर्षक पगार

नोकरीसाठी परीक्षा होणार असून त्यासाठी ७ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे
 government jobs for 12th pass
government jobs for 12th pass

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत (staff selection commission) केंद्र सरकारच्या (Government) विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये १२ वी झालेल्यांसाठी नोकरीची (Job) संधी आहे. येथे डेटा एंट्री ऑपरेटर, निम्न विभाग लिपिक, पोस्टल सहाय्यक आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार परीक्षेसाठी 7 मार्च 2022 पर्यंत ( आयोगाच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

 government jobs for 12th pass
कार्टून बघायचं, डोनट्स खायचे! एवढचं करून 'तो' कमावतो लाखोंचा पगार

अशी आहे पात्रता

उमेदरवाराचे वय - १२ वी पास झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे.

पगार- विविध पदांसाठी पात्र असलेल्या व्यक्तींना १९९९० पासून ९२,३०० पर्यंत दर महिना पगार मिळणार आहे. यासाठी त्या त्या पोस्टनिहाय पगार काय असेल ते भरतीच्या जाहिरातीत बघता येईल.

निवड प्रक्रिया- या पदांसाठी उमेदवारांची निवड करताना तीन टप्प्यात परीक्षा घेतली जाईल. भाग १ मध्ये संगणक आधारित चाचणी, भाग २ मध्ये वर्णनात्मक पेपर आणि भाग ३ मध्ये टायपिंगची कौशल्य चाचणी घेतली जाईल.

परीक्षा पॅटर्न - भाग १ पेपर २०० मार्काचा असून त्यात ऑनलाईन १०० प्रश्न विचारले जातील. त्यासाठी उमेदरवारांना १ तास वेळ दिला जाणार आहे.

 government jobs for 12th pass
Google Map वरची ठिकाणं शोधा; भरपूर पैसे मिळवा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com