
मृदुला अडावदकर - सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
भाषेवरचं प्रभुत्व हे करिअरच्या दृष्टीने कसं महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं. आता भाषेचं व्याकरण का शिकायचं? याचा विचार करू या. आदिम काळापासून मानव निसर्गाचे नियम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मानवी उत्क्रांaतीमध्ये भाषेची उत्क्रांती हा मानवी विकासाचा मोठाच टप्पा मानला जातो. मानवी बुद्धिमत्तेचा आविष्कार म्हणजे भाषा. अर्थाच्या पातळीवर समानता यावी म्हणून मग व्याकरणकारांनी त्याचे नियम मांडले. अर्थात भाषा आधी आणि व्याकरण त्यानंतर. कोणत्याही भाषेचं व्याकरण पाहिलं तर त्यात मुळाक्षरे, स्वर, व्यंजन अशी मूलद्रव्ये दिसतात. त्यानंतर शब्दविचार येतो.