सिव्हिल आणि पॉलिमर अभियंत्रिकी वेबिनारला भरघोस प्रतिसाद

जाहिरात
Wednesday, 11 November 2020

एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे आणि सकाळ माध्यम समूहाकडून आयोजित केलेल्या सिव्हिल आणि पॉलिमर अभियंत्रिकी वेबिनारला विद्यार्त्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ऑक्टोबर 26 रोजी झालेल्या ह्या वेबिनारसाठी 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

पुणे: एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे आणि सकाळ माध्यम समूहाकडून आयोजित केलेल्या सिव्हिल आणि पॉलिमर अभियंत्रिकी वेबिनारला विद्यार्त्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. ऑक्टोबर 26 रोजी झालेल्या ह्या वेबिनारसाठी 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे मधून प्रा. डॉ.  प्रसाद खांडेकर, अधिष्ठाता, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखा, प्रा.मृदुला कुलकर्णी, विभाग प्रमुख, स्थापत्य अभियांत्रिकी, अनघा खरे, सहायक प्राध्यापक, पॉलिमर अभियांत्रिकी आणि दिनेश भुतडा, सहयोगी  प्राध्यापक, रासायनिक अभियांत्रिकी ह्या तज्ञांनी वेबिनारद्वारे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.
 
बदलत्या काळात, सिव्हिल अभियांत्रिकी आणि पॉलिमर अभियांत्रिकी ह्या दोन क्षेत्रात निर्माण होत असलेल्या वाढत्या संधींची माहिती ह्या वेळी विद्यार्थ्यांना देण्यात अली. उद्योग क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (artificial intelligence), मशीन लर्निंग (machine learning), डेटा सायन्स (data science, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) सारख्या विशेष अभ्यासक्रमाचे महत्त्व ही ह्यावेळी विद्यार्थांना सांगण्यात आले. 

 
सध्या, सिव्हिल अभियांत्रिकी आणि पॉलिमर अभियांत्रिकी, हे दोन्ही अभ्यासक्रम, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग सारख्या विशेष अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांना उद्योग सज्ज करण्यासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे येथे उपलब्ध आहेत. एमआयटी-डब्ल्यूपीयू, पुणे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखा एमआयटी पुणेकडून  मिळालेला  ४ दशकांचा वारसा पुढे घेऊन जात असताना, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे उद्योग सज्ज अभियंते तयार करत आहे. 
याविषयी अधिक माहितीसाठी mitwpu.edu.in or call - 020 71177137 / 42 येथे संपर्क करू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great response to the Civil and Polymer Engineering webinar