- डॉ. राजेश ओहोळ, करिअर तज्ज्ञ
पर्यावरण, संसाधने आणि लोकसंख्या या जगासमोरील तीन मुख्य समस्या आहेत, पर्यावरणीय ऱ्हास समस्यांमुळे मानवी अस्तित्व आणि विकासाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. संसाधनांचे उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या कचऱ्यामुळे गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होते.