

Using Guided Imagery technique for exam stress management
Sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
आपण गेल्या आठवड्यात अभ्यासातील एकाग्रता कशी आणायची याबाबत माहिती घेतली. गाइडेड इमॅजरी तंत्राचा वापर केल्यास ती साधणे अधिक सोपे जाते. परीक्षेच्या मानसिक तयारीसाठी या तंत्राचा चांगला उपयोग करता येतो. मनाच्या कल्पनाशक्तीच्या ताकदीचा योग्य पद्धतीने उपयोग करणे आवश्यक आहे. यामध्ये आपण कल्पनेत नसून खरोखरचे वास्तव अनुभवत आहोत असा प्रत्यय यावयास हवा. तरच त्याचा उपयोग होतो. म्हणूनच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्र शिकल्यास उत्तम. रोज त्याचा दोन तीनदा उपयोग केल्यास परीक्षेचा अनावश्यक ताण कमी होऊन फायदा झाल्याचा अनुभव आहे.