खूशखबर ! 'या' कंपनीत १५ हजार कामगारांची भरती

HCL Tech to hire 15000 from campuses this fiscal
HCL Tech to hire 15000 from campuses this fiscal

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात मोठ्या प्रमाणात वाढलेला असाताना अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आलेली असताना मात्र देशातील मोठी आयटी कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने तरुणांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. चालू आर्थिक वर्षात १५हजार लोकांती मोठी भरती करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्यावर्षी एचसीएलने ९ हजार नवीन लोकांना नोकरी दिली होती. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी ६ हजार अधिक लोकांना नोकरी देण्यात येणार आहे. याआधी देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने ४४ हजार लोकांना नोकरी देण्याची घोषणा केली होती, अशातच तरुणांसाठी आणखी एक मोठी बातमी आली आहे.

टाइ्म्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एचसीएल टेकचे एचआर हेड व्हीव्ही अप्पाराव यांनी अशी माहिती दिली आहे की, कोरोना व्हायरसमुळे कँपस प्लेसमेंट प्रभावित झाले आहेत. यामुळे विविध संस्थाच्या कामकाजामध्ये बाधा निर्माण झाली आहे. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, या फ्रेशर्ससाठी पगार वार्षिक सरासरी साडेतीन लाख रुपये प्रतिवर्ष असा असेल.

कोराना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आणि जवळपास ९६ टक्के कर्मचारी घरून काम करत असून देखील कंपनीने जूनच्या तिमाहीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचा फायदा ३१.७० टक्क्यांनी वाढून २९२५ कोटी राहिला आहे. गेल्यावर्षीच्या जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीचा फायदा २२२० कोटी होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com