हेल्थ केअर : मेडिकल करिअरला फिजिक्सचा बूस्टर

भौतिकशास्त्र विषय म्हणजे न्यूटनचे नियम अभ्यासणे किंवा समजायला अवघड असणारे गणितीय प्रॉब्लेम्स सोडवणे एवढेच नाही.
मेडिकल करिअर
मेडिकल करिअरSakal

भौतिकशास्त्र विषय म्हणजे न्यूटनचे नियम अभ्यासणे किंवा समजायला अवघड असणारे गणितीय प्रॉब्लेम्स सोडवणे एवढेच नाही. मेडिकल क्षेत्रातील सर्वच उपकरणांचा उगमच या विषयांतून झाला आहे. फक्त उपकरणेच नाहीतर शरीरातील अनेक अवयवांची कार्य आणि त्यांची रचना समजायलाही फिजिक्स विषयातील ज्ञान आवश्यक असते.

फिजिक्स विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी घेतानाच संगणकाचे मूलभूत ज्ञान आणि संगणक प्रोग्रॅमिंगचे कौशल्य आत्मसात केल्यास याचा फायदा करिअरसाठी होतो. फिजिक्ससह इलेक्ट्रॉनिक विषयातील अधिकचे कौशल्य आत्मसात केल्यास मेडिकल उपकरण क्षेत्रात स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करता येते.

कोरोनामुळे जगभरातील लोकांचे लक्ष संसर्गजन्य आजार आणि त्यावरील उपचार याकडे गेले आहे. संसर्गजन्य आजारांसाठी सध्या वापरात असणारी औषधे परिणामकारक ठरताना दिसून येत नाहीत. यावर उपाय म्हणून, चुंबकीय ऊर्जा, रेडिओफ्रिक्वेंसी आणि लेसर यांचा वापर करून नवीन उपचार पद्धती विकसित होताना दिसून येत आहे. पुढील पाच वर्षांमध्ये अशा प्रकारची उपचारपद्धती अनेक हॉस्पिटल्समध्ये दिसून येईल. फिजिक्सबरोबर शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञान याचा अभ्यास केल्यास या क्षेत्रात संशोधनाला संधी उपलब्ध होणार आहेत.

फक्त मॉडर्न मेडिसिनच नाही, तर भारतामध्ये सध्या ज्या विषयात सर्वाधिक संशोधनाची संधी आहे त्या आयुर्वेदाचे ज्ञान घेतल्यास, स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करणे खूप सोपे आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात फिजिक्स विषयातील पदवीधर अमेरिकन मुलीने, हिमालयातील बुरशींचा अभ्यास केला. त्यांची नैसर्गिक शक्ती ओळखून रेडिओफ्रिक्वेंसी बरोबर एकत्रित करत स्त्रियांमधील गर्भाशयाच्या कॅन्सरवर नवीन उपचार पद्धती शोधली आहे.

हॉस्पिटलमधील उपकरणे, रुग्णांचे बेड किंवा टेबल यावरून होणारा बुरशींचा संसर्ग, त्याचबरोबर कोरोना किंवा विषाणूच्या किंवा जिवाणूमुळे होणारा संसर्ग रोखण्यासाठी उपायकारक अतिनील किरणांवर आधारित अनेक छोटी उपकरणे सध्या बाजारात येत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील या विषयातील अतिरिक्त कौशल्य असल्यास ज्याकडे दुर्लक्ष झाले आहे अशा विषयात पदवी घेऊनही भविष्यात करिअरच्या संधी उपलब्ध होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com