esakal | बुधवारपासून राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

MHT-CET Exam

बुधवारपासून राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या परीक्षा

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण (higher education), उच्च शिक्षण संचालनालयानाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (Admission) आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी (MHT-CET) परीक्षेची सुरुवात बुधवारी, १५सप्टेंबर पासून होणार आहे. यासाठी विद्यार्थ्याना त्यांच्या लॉगीन वर परीक्षांचे प्रवेशपत्र (Admit Card) ऑनलाईन (online) पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 354 नव्या रुग्णांची भर; 7 जणांचा मृत्यू

मास्टर ऑफ कम्प्युटर सायंन्स, हॉटेल मॅनेजमेंट,‍अ‍र्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, या अभ्यासक्रमांच्या सीईटी या १५ सप्टेंबर रोजी होणार आहेत. यानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेला २० सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ५ लाख ५ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

यामध्ये पीसीएम गटातून २ लाख २८ हजार ४८६ तर पीसीबी गटातून २ लाख ७७ हजार ३०२ नोंदणी केली आहे. सर्वाधिक विद्यार्थी या सीईटीसाठी आहेत. या प्रवेश परीक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्यासाठी संकेतस्‍थळावर लिंक उपलब्‍ध आहे. संकेतस्थळावर लिंकद्वारे उपलब्‍ध होणाऱ्या संकेतस्‍थळावर विद्यार्थ्यांनी त्‍यांचा अर्जाचा क्रमांक (ॲप्लि‍केशन नंबर) आणि जन्‍मतारीख दाखल करत प्रवेशपत्राची प्रत मिळवायची आहे. या प्रवेशपत्रावरील माहिती तपासात, तसेच सूचनांचे बारकाईने वाचन करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. एकूण १५ अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, टप्प्‍याटप्प्‍याने या सर्व शिक्षणक्रमांच्‍या सीईटीचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध केले जाणार आहेत असे सीईटी सेलने म्हटले आहे.

loading image
go to top