

Homeschooling vs Traditional School Education
esakal
आजच्या काळात होम स्कूलिंग अर्थात घरच्या घरी शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. शाळेतील अभ्यासाचा ताण, परीक्षांची स्पर्धा, मुलांच्या आवडी-निवडींना मिळणारा अपुरा वाव, प्रवासात जाणारा वेळ, मूल्य शिक्षणाचा अभाव आणि शाळांच्या गुणवत्तेबद्दलच्या अपेक्षा यांमुळेच बहुधा काही पालक होम स्कूलिंगचा पर्याय निवडतात. याशिवाय अलीकडच्या काळात डिजिटल तंत्रज्ञानामुळे घरबसल्या उत्तम शैक्षणिक साधनेही उपलब्ध झाल्याने होम स्कूलिंग सोपे झाले आहे.