

Horizon Europe
esakal
New Delhi: परदेशात संशोधन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संशोधकांसाठी एक मोठी संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. भारत सरकार आणि युरोपीय महासंघाने (ईयू) संशोधन क्षेत्रातील एका महत्त्वाच्या करारासाठीच्या वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. यामुळे भारतीय संशोधक, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांना युरोपच्या ‘होरायझन युरोप’ या संशोधन कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. आवश्यक करार आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जानेवारी २०२७ पासून ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.