विशेष : मानवी व कृत्रिम बुद्धिमत्ता : शिक्षणातील नवे सहजीवन

एआयमुळे शिक्षणात नवे सहजीवन : शिक्षकांची भूमिका अधिक सक्षम, विद्यार्थ्यांसाठी समजून घेण्याचा साथीदार, पण नुसत्या ‘कॉपी-पेस्ट’वर मर्यादा घालण्याची गरज
"एआय उत्तम चित्र काढेल, पण चित्रकाराचा आनंद देऊ शकणार नाही!" मानवी संवेदना आणि यंत्राची गती यांचा समतोल कसा साधावा?

"एआय उत्तम चित्र काढेल, पण चित्रकाराचा आनंद देऊ शकणार नाही!" मानवी संवेदना आणि यंत्राची गती यांचा समतोल कसा साधावा?

Sakal

Updated on

डॉ. सुनीता भागवत, शिक्षणतज्ज्ञ

तंत्रज्ञानाबद्दलचे गैरसमज हे आपल्या समाजाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. रेडिओ आला तेव्हा लोकांना वाटले की आता पुस्तके वाचली जाणार नाहीत. दूरदर्शन आले तेव्हा पालकांना भीती वाटली की मुलांचे अभ्यासावरचे लक्ष उडून जाईल. संगणक शाळांमध्ये दाखल झाले तेव्हा अनेक शिक्षकांना वाटले की आता शिक्षकांची गरजच उरणार नाही. इंटरनेट सर्वत्र पोहोचले तेव्हा काहींना वाटले की विद्यार्थी स्वतः विचार करणे विसरतील. आणि आज, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शिक्षणाच्या दारात उभी आहे तेव्हा पुन्हा एकदा तेच प्रश्न, तेच गैरसमज, आणि तेच भय मनात डोकावू लागले आहेत. तंत्रज्ञान शिक्षकांना बदलत नाही; ते अधिक सक्षम बनवते. ‘एआय’ही त्याला अपवाद नाही. योग्य वापर केला तर ‘एआय’ शिक्षण अधिक सखोल, अधिक सहकार्यपूर्ण आणि अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com