जेईई मेन २०२० - उत्तम गुण कसे मिळवाल?

अरुण जैन
Tuesday, 10 December 2019

१. जेईई मेन प्रवेश परीक्षेचे पहिले सत्र ६ ते ११ जानेवारी २०२० दरम्यान होईल, तर दुसरे २ ते ९ एप्रिल २०२० या काळात घेण्यात येईल. 
२. ही प्रवेश परीक्षा संगणकीय (कॉम्प्युटर) बेस्ड) असेल. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व गणित  या तीन विषयांचे प्रत्येकी २५ म्हणजे एकूण ७५ प्रश्‍न असतील. मात्र, २०२०पासून झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे, प्रश्‍नपत्रिकेत २० प्रश्‍न पर्यायी उत्तरे (एमसीक्‍यू)+ ५ प्रश्‍न अंकात उत्तर लिहिण्याचे असे एकूण २५ प्रश्‍न असतील. 
३. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अंकात उत्तरे लिहा, या प्रकारचे नमुना प्रश्‍न त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले आहेत, ते देखील जरूर पाहावेत.

वाटा करिअरच्या - अरुण जैन, जेईई तज्ज्ञ, शाखाप्रमुख, एलन करिअर इन्स्टिट्यूट, पुणे 
१. जेईई मेन प्रवेश परीक्षेचे पहिले सत्र ६ ते ११ जानेवारी २०२० दरम्यान होईल, तर दुसरे २ ते ९ एप्रिल २०२० या काळात घेण्यात येईल. 
२. ही प्रवेश परीक्षा संगणकीय (कॉम्प्युटर) बेस्ड) असेल. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र व गणित  या तीन विषयांचे प्रत्येकी २५ म्हणजे एकूण ७५ प्रश्‍न असतील. मात्र, २०२०पासून झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे, प्रश्‍नपत्रिकेत २० प्रश्‍न पर्यायी उत्तरे (एमसीक्‍यू)+ ५ प्रश्‍न अंकात उत्तर लिहिण्याचे असे एकूण २५ प्रश्‍न असतील. 
३. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) अंकात उत्तरे लिहा, या प्रकारचे नमुना प्रश्‍न त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले आहेत, ते देखील जरूर पाहावेत. 

४. शेवटच्या दिवसांतील तयारीसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना -
१) परीक्षेसाठी आता सुमारे एक महिनाच वेळ असल्यामुळे तयारी पूर्ण जोशात करणे आवश्‍यक आहे. आपल्या वेळेचे अत्यंत काटेकोरपणे आणि विचारपूर्वक नियोजन करा. 
२) सर्वप्रथम प्रत्येक विषयाची, प्रत्येक पाठाची तुमच्या तयारीनुसार उत्तम/ साधारण/ कमकुवत या तीन प्रकारांत वर्गवारी करा. 
३) कमकुवत गटातील पाठाचे (थिअरी) पुन्हा वाचन करून पक्के करा. साधारण या गटातील पाठ आणखी पक्के करण्यासाठी प्रयत्न करा आणि उत्तम तयारी झालेल्या पाठांवरील आधारित प्रश्‍न निर्धारित वेळेत सोडविण्याचा सरावा करा. कमकुवत पाठांचे वाचन (थिअरी) हे येत्या दोन आठवड्यांत पूर्ण झाले पाहिजे. 
४) प्रवेश परीक्षा ही एनसीईआरटी अभ्यासक्रमानुसार आधारित असल्याने, तुमचे सध्याचे बारावी परीक्षेचे बोर्ड कोणतेही असले तरी एनसीईआरटीची तीनही विषयाची पाठ्यपुस्तके काळजीपूर्वक वाचा. 
५) तीनही विषयांमध्ये काही पाठ केवळ जेईई मेन परीक्षेसाठी आहेत, परंतु जेईई ॲडव्हॉन्स्डच्या परीक्षेत समाविष्ट नाहीत. त्यांची तयारी अतिशय कसून करा कारण, जेईई मेनमध्ये गुण वाढविण्यात ते अतिशय महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ-  Chemistry In Everyday Life, Envoronmental Chemistry इत्यादी. 
६) मागील कमीत कमी ७ वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका वेळ लावून सोडवा आणि कोणत्या विषयांच्या कोणत्या पाठावर पुन्हा थोडे लक्ष देण्याची गरज आहे, हे ठरवा. यामुळे तुमच्या तयारीची देखील तुम्हाला कल्पना येईल, तसेच कमकुवत दुवे हेरण्यात मदत होईल. 
७) नेहमी लक्षात ठेवा, परीक्षेत आपल्या कौशल्याचे उत्तम प्रदर्शन करण्यासाठी विषयांची उजळणी करीत राहणे महत्त्वाचे आहे. 
८) तुम्ही पूर्वी वाचलेल्या पाठांची आणि सोडविलेल्या प्रश्‍नांची पुन्हा उजळणी करा, कारण अनेक प्रश्‍न हे त्यावर पुर्नआधारित असतात. 
९) तुमचे अभ्यासाचे वेळापत्रक दररोज बदलू नका, सूचित केलेल्या वेळापत्रकाचे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पालन करण्याचा प्रयत्न करा. 
१०) परीक्षेच्या आधी ४५ मिनिटे पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित पूर्वपरीक्षा (मॉक‌ टेस्ट) देण्याचा प्रयत्न करा 
११) परीक्षेपूर्वी शांत राहा, आनंदी राहा आणि सहा तासांची व्यवस्थित झोप आणि संतुलित योग्य आहार यांची सवय लावा. 

प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी सूचना -
१) ही परीक्षा संगणकीय (कॉम्प्युटर बेस्ड) असल्याने, जानेवारी सत्रातील परीक्षेपूर्वी तुम्ही एकतरी मॉक सीबीटी म्हणजे संगणकावर आधारित पूर्वपरीक्षा देणे आवश्‍यक आहे. 
२) ज्या विषयात तुमचा आत्मविश्वास उत्तम आहे, त्या विभागापासून प्रश्‍नपत्रिका सोडवायला सुरुवात करा. प्रश्‍न वाचण्यात, समजून घेण्यात, जोखण्यात तुमचे शंभर टक्के लक्ष द्या तसेच विचार, आकडेमोड आणि प्रश्‍नाचे विश्‍लेषण हे लक्षपूर्वक करा. तुम्हाला ते जमत नसेल तर तो प्रश्‍न सोडून द्या, कारण लक्षात ठेवा चुकीच्या उत्तरासाठी तुमचा एक गुण वजा होणार आहे. हे केल्यास तुमचा क्रमांक सुधारण्यात मदतच होईल. कारण बरेच विद्यार्थी सर्व प्रश्‍न सोडवितात व चुकीच्या उत्तरांचे गुण वजा झाल्याने त्यांचा क्रमांक घसरतो. 
३) आकडेमोड (कॅल्क्‍युलेशन)/ पर्यायाचे विश्‍लेषण (ऑप्शन ऍनालिसीस)/ निष्कासन पद्धती (इलेमिनेशन मेथड) या सर्व बाबी प्रश्‍न सोडवितानाच वापरल्या पाहिजेत. 
(क्रमशः)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to get the best points in JEE main Exam 2020