esakal | अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामर बना अन् करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Application Programmer

अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामर बना अन् करा लाखोंची कमाई, जाणून घ्या सविस्तर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

तुम्ही मोबाईल, काॅम्प्युटर किंवा लॅपटाॅपचा वापर करतच असाल. त्यात वेगवेगळे साॅफ्टवेअर किंवा अ‍ॅपचा वापर नक्कीच करत असात यामध्ये असलेले सॉफ्टवेयरमध्ये अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामरचा मोठा वाटा असतो

अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅमर काॅम्प्युटर आणि इतर इलेक्ट्राॅनिक डिव्हाईसमध्ये वापरण्यात येणारे साॅफ्टवेअरसाठी कोड लिहितात. ते अ‍ॅप्लिकेशनचे परीक्षण आणि मूल्यांकनही करतात. तसेच अ‍ॅप्लिकेशनला युजर फ्रेंडली बनवण्यासाठी त्यात बदल किंवा माॅडिफिकेशन करतात. ते ग्राहकांच्या गरजेनुसार साॅफ्टवेअर आणि ट्रेनिंग मॅन्युअल्स तयार करतात. ते युजरला ट्रेनिंगही देतात.

पात्रता

- या क्षेत्रात जाण्यासाठी तुमच्याकडे काॅम्प्युटर सायन्सची डिग्री किंवा आयटीची इतर डिग्री असायला हवी. बरोबरच प्रोग्रॅमिक स्किल्सवर मजबूत पकड असायला हवी. साधारण साॅफ्टवेअर आणि प्रोग्रॅमिंगची लँग्वेज जसे की जावाही येणे आवश्यक आहे.

कुठे मिळेल नोकरी?

- काॅम्प्युटर आणि आयटी कन्सल्टन्सी फर्म

- इंजिनिअरिगं कंपनी

- सर्व्हिसेस इंडस्ट्री

- वित्तीय संस्थान

- टेलिकाॅम कंपन्या

- टूर आणि ट्रॅव्हलशी संबंधित कंपन्या

करिअर

- तुम्ही एखाद्या कंपनीत प्रथम साॅफ्टवेअर ट्रेनी किंवा टेक्निकल असोसिएट म्हणून जाॅईन कराल. जाॅईनिंग नंतर तुम्हाला काॅम्प्युटर लँग्वेज आणि फंडामेंटल्समध्ये ट्रेनिंग दिली जाईल. तुमची प्रगती पाहून ज्युनिअर साॅफ्टवेअर इंजिनिअर, सीनियर साॅफ्टवेअर इंजिनिअर, टेक्निकल अॅनालिस्ट आणि टीम लीडर बनू शकता. पुढे बडती मिळून तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर आणि डिलिव्हरी मॅनेजर बनू शकता.

काय असते काम?

- बिझनेस युनिट्ससाठी साॅफ्टवेअर अॅप्लिकेशन तयार करणे. त्याची देखभाल आणि परीक्षण करणे

- बिझनेसशी संबंधित वेगवेगळे अॅप्लिकेशनचे डिझाईन बनवणे. त्यांना तयार करणे आणि कार्यान्वित करणे.

- विशिष्ट उपक्रम आणि प्रकल्प कार्यान्वित करणे

- साॅफ्टवेअर अॅप्लिकेशन कार्यान्वित करणे

- बजेटच्या आत प्रकल्पावर काम करण्यासाठी सूचना देणे, मार्गदर्शन करणे आणि नेतृत्व करणे

- प्रकल्प वेळेत पूर्ण होईल या कडे लक्ष देणे

- डेटा मायग्रेशन किंवा डेटा इंटरफेस प्रोसेस तयार आणि कार्यान्वित करणे.

loading image