Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात नोकरी कशी मिळवायची? मिळतो एवढा पगार

भारतामध्ये दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी 'भारतीय तटरक्षक दिन' साजरा केला जातो.
Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात नोकरी कशी मिळवायची? मिळतो एवढा पगार

भारतामध्ये दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी 'भारतीय तटरक्षक दिन' (Indian Coast Guard Day 2024) साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी, देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना सन्मानित केले जाते. भारतीय तटरक्षक दल हे देशाच्या सागरी सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे दल आहे, जे सागरी क्षेत्रांचे संरक्षण, चाचेगिरी आणि तस्करी रोखण्यात आणि सागरी आपत्तींपासून संरक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 

18 ऑगस्ट 1978 रोजी 'तटरक्षक कायदा, 1978' द्वारे भारतीय तटरक्षक दलाची अधिकृत स्थापना करण्यात आली. परंतु एक वर्षाच्या आधी म्हणजेच 1977 मध्ये, 1 फेब्रुवारीला आणीबाणीमुळे, तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार, दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात भारतीय तटरक्षक दिन साजरा केला जातो. 

शांततेच्या काळात देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणारे भारतीय तटरक्षक दल दरवर्षी शेकडो वेगवेगळ्या पदांवर भरती करते. याशिवाय भारतीय तटरक्षक दल कमांडंट, असिस्टंट कमांडंट आणि इंजिनिअर अशा विविध पदांची भरती करते. तटरक्षक दलात नाविकांसाठी तीन प्रकारची प्रवेश आहे. मेकॅनिकल, सेलर जीडी आणि सेलर डोमेस्टिक शाखा. या सर्वांची वयोमर्यादा १८ ते २२ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना तीन ते पाच वर्षांची सूट मिळते.

शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर नाविक यांत्रिक पदासाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. तसेच मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ/पॉवर) मध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर नाविक डीबी या पदासाठी फक्त 10वी पास असणे आवश्यक आहे. तर, नाविक जीडीसाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, https://joinindiancoastguard.gov.in/sailorentry.html अधिकृत वेबसाइट पहा.

भारतीय तटरक्षक दलातील सर्वात मोठे पद कोणते आहे?

भारतीय तटरक्षक दलातील सर्वात मोठे पद म्हणजे महासंचालक. तटरक्षक दलाचे महासंचालक पद हे 3 स्टार रँकचे अधिकारी असते. जे भारतीय नौदलाचे व्हाईस ॲडमिरल, लष्कराचे लेफ्टनंट जनरल आणि वायुसेनेचे एअर मार्शल या रँकच्या बरोबरीचे असते. तटरक्षक दलाच्या महासंचालकांचे स्टार्टिंग बेसिक सॅलरी 2 लाख 5 हजार रुपये प्रति महिना आहे.

तटरक्षक दलाच्या महासंचालकांच्या जबाबदाऱ्या

भारतीय तटरक्षक दलाचे सर्वात मोठे अधिकारी हे दिल्ली येथे स्थित तटरक्षक मुख्यालय (CGHQ) मधील सर्व कमांड कीच्या कामाचे निरीक्षण करतात. मुख्यालयात इन्स्पेकटर जनरल रँकचे चार उपमहासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांचे सहाय्यक असतात.

महासंचालकांना उपलब्ध सुविधा

तटरक्षक दलाच्या महासंचालकांना सरकारी निवासस्थान, सरकारी वाहने, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा आणि एक सहाय्यक यासह सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com