विशेष : व्यक्तिमत्त्व विकास

सॉफ्टस्किलमधील व्यक्तिमत्त्व विकासामुळे संवादकौशल्य, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि शिष्टाचार घडून करिअर, व्यवसाय व नातेसंबंधात यशाची दारे उघडतात
केवळ ज्ञान असून चालणार नाही, सादरीकरणही हवे 'डॅशिंग'! प्रा. सुभाष शहाणे यांनी मांडले व्यक्तिमत्त्व विकासाचे व्यावसायिक महत्त्व

केवळ ज्ञान असून चालणार नाही, सादरीकरणही हवे 'डॅशिंग'! प्रा. सुभाष शहाणे यांनी मांडले व्यक्तिमत्त्व विकासाचे व्यावसायिक महत्त्व

Sakal

Updated on

प्रा. सुभाष शहाणे

आपण एखाद्या सरकारी-खासगी बॅकेच्या, कॉर्पोरेट ऑफीसमध्ये, एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या स्वागत कक्षात प्रवेश करतो तेव्हा अग्रभागी एखादी रूबाबदार, गोड आवाजाची, बोलकी, प्रसन्न, विनम्र व्यक्ती कार्यरत दिसते. या व्यक्तीच्या उत्कृष्‍ट संवाद कौशल्यामुळे व आकर्षक देहबोलीबरोबर चांगले शिष्टाचार यामुळे आपण प्रभावित होतो. त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते व त्यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. हे सर्व व्यक्तिमत्त्व विकासामुळे शक्‍य होते. व्यक्तिमत्त्व विकास हा सॉफ्ट स्किलचा महत्त्वाचा घटक आहे. कारण आपल्याकडे केवळ ज्ञान असून चालणार नाही, तर ते आत्मसात करून सादर करण्याची किंवा ते प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य गरजेचे आहे. लोकांबरोबर कसे बोलायचे किंवा लोकांशी कसे वागायचे, हे आवश्यक आहे. व्यवसायात, नोकरीत प्रामाणिकपणा, इमानदारी, वेळेला महत्त्व देणे, सचोटी व परिश्रम इत्यादींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तिमत्त्व विकासातून आपण ते साध्य करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com