How To control Anger : लहानसहान गोष्टींचा पटकन राग येण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, हे समजतही नाही. रागामुळे स्वत:चे नुकसान तर होतेच, शिवाय आपण अनेकदा नातेसंबंधही दुखावून बसतो. हा राग कंट्रोल कसा करायचा?.काम, क्रोध, लोभ, मोह, माया व मत्सर या सहा अवगुणांमधील क्रोध म्हणजे राग हा अत्यंत घातक आहे. या रागात आपला आपल्यावरच ताबा राहत नाही आणि मनुष्य संपूर्णतः अविचारीपणे वागतो. कित्येकदा अतिरागात अगदी टोकाची भूमिकादेखील घेतली जाते. पण त्याने नुकसान हे आपलं स्वतःचंच होत असतं..Memory Improvement Tips : वाचलेलं लक्षात राहत नाही? मग स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फॉलो करा हे महत्वाचे टिप्स.आपल्या विचारांचा परिणाम हा आपल्या सभोवतालच्या गोष्टींवर पडत असतो. तसेच आपल्या वाईट विचारांचा घातक परिणाम आपल्या शरीरावरदेखील होत असतो. एखाद्या मनुष्याला अत्यंत क्रोध आला तर त्याच्या शरीरात विशिष्ट प्रकारच्या लहरी, स्पंदने किंवा Vibrations निर्माण होतात. अशा वेळी त्या मनुष्याचा चेहरा लालबुंद होतो. देह थरथर कापू लागतो. डोळे लाल होतात व त्याला धड बोलताही येत नाही..अशा मनुष्याचे रक्तसुद्धा विषारी बनते. इतके की जर ते एखाद्या मांजराला किंवा कुत्र्याला टोचले तर तो प्राणी प्राणाससुद्धा मुकतो! अतिक्रोधाला बळी पडणारी माणसे रोगी होतात, याचे कारण हेच होय..तुकाराम महाराज सांगतातखवळलिया काम क्रोधी। अंगी भरती आधी व्याधी।।तर जेव्हा आपण रागात असतो तेव्हा त्या रागाने आपलंच नुकसान होत असतं. बऱ्याचवेळा समोरची व्यक्ती आपला राग पाहून आनंदितही होते. मग आपण कधी अशी गोष्ट करतो का ज्याने आपलं स्वतःचंच नुकसान होईल? नाही ना! मग यानंतर कधीही राग आला तर स्वतःला विचारा की या रागाने नुकसान कुणाला होणार आहे.(सकाळ अर्काईव्हमधून).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.