HSC Exam Paper : बारावीच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी पेपरमध्ये चूक

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी (०१) हा पहिला पेपर होता.
HSC Question Paper
HSC Question Papersakal
Summary

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी (०१) हा पहिला पेपर होता.

पुणे - राज्यात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरवात झाली खरी, परंतु महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे पहिल्याच इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुक आढळली. परिणामी राज्य मंडळाला प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकीबद्दल विद्यार्थ्यांना सहा गुण द्यावे लागणार आहेत. राज्य मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रश्नपत्रिकेच्या छपाईत झालेल्या चुकीचा लाभ मात्र विद्यार्थ्यांना होणार आहे.

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली. बारावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी (०१) हा पहिला पेपर होता. या पेपरमध्ये कवितेवर आधारित तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नात प्रश्नच राज्य मंडळाकडून छापण्यात आले नाहीत. तर एक प्रश्न विचारण्याऐवजी त्याठिकाणी उत्तर छापण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हे तिन्ही प्रश्न प्रत्येकी दोन गुणांचे असून एकूण सहा गुणांचे प्रश्नांत चुक झाली आहे.

याबाबत राज्य मंडळास विचारणा केली असता, प्रश्नपत्रिकेच्या छपाईत चुक झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान, याशिवाय बारावीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत आणखी एक चूक झाल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रश्नपत्रिकेत तीन क्रमांकात चूक झाल्याचे इंग्रजीच्या शिक्षकांचे म्हणणे आहे.

‘प्रथमदर्शनी प्रश्नपत्रिकेत छपाईची चुक झाली असल्याचे दिसून येत आहे. प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्न छापण्यात आलेले नाहीत, तर एका प्रश्नांऐवजी उत्तरच छापण्यात आले आहे. याबाबत परीक्षेचे नियामक, मुख्य नियंत्रकांचा अहवाल घेण्यात येईल. त्यात चूक निदर्शनास आल्यानंतर संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केलेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहेत.’

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com