
Maharashtra HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यापैकी १३ लाख ८७ हजार ४६८ विद्यार्थी म्हणजेच ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात १.४९ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे.