HSC results : निकाल लागला; आता पुढील प्रवेशासाठी ही कागदपत्रे ठेवा तयार

बारावी नंतर प्रवेशासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा जेणेकरून ऐनवेळी काही कागदपत्रे नसल्याने प्रवेश हुकणार नाही.
admission
admissiongoogle

मुंबई : बारावी नंतर प्रवेशासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवा जेणेकरून ऐनवेळी काही कागदपत्रे नसल्याने प्रवेश हुकणार नाही.

मेडीकल प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  • 1) नीट आँनलाईन फाँर्म प्रिंट

  • 2) नीटप्रवेश पत्र

  • 3) नीट मार्क लिस्ट

  • 4)10 वी चा मार्क मेमो

  • 5)10 वी सनद

  • 6) 12वी मार्क मेमो

  • 7) नँशनँलीटी सर्टीफिकेट

  • 8 रहिवाशी प्रमाणपत्र

  • 9)12 वी टी सी

  • 10) मेडिकल सर्टिफिकेट फिटनेस

  • 11) आधार कार्ड

  • 12) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा

  • 13) मुलाचे राष्ट्रीय बँकेतील खाते

  • 14) मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पँन कार्ड

admission
बारावीनंतर काय ? हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करा करिअर

मागासवर्गीयांसाठी वरील सर्व व खालील प्रमाणपत्रे

  • 1) जातीचे प्रमाणपत्र

  • 2) जात वैधता प्रमाणपत्र

  • 3) नाँन क्रिमीलीयर प्रमाणपत्र

(मागील काढलेले असेल तर ३१ मार्च २०२१ पर्यंत ग्राह्य)

इंजिनीअरिंग प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

  • 1) MHT-CET आँनलाईन फाँर्म प्रिंट

  • 2) MHT-CET पत्र

  • 3) MHT-CET मार्क लिस्ट

  • 4)10 वी चा मार्क मेमो

  • 5)10 वी सनद

  • 6) 12वी मार्क मेमो

  • 7) नँशनँलीटी सर्टीफिकेट

  • 8 ) रहिवाशी प्रमाणपत्र

  • 9)12 वी टी सी

  • 10) आधार कार्ड

  • 11) उत्पन्न प्रमाणपत्र किंवा फाँर्म नं 16 वडिलांचा

  • 12) राष्ट्रीय बँकेतील खाते

  • 13) फोटो.

फॉर्म भरताना हे लक्षात ठेवा.

  • अर्ज भरायला जाताना मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नागरिकत्व, आधार कार्ड आणि घराच्या पत्त्याच्या पुराव्याची अटेस्टेड कॉपी न्यायला विसरू नका. पासपोर्ट आकाराचा फोटो, डिंक, त्याचबरोबर कागदपत्रे जोडण्यासाठी स्टेपलर जवळ ठेवा.

  • विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, ई-मेल, नागरिकत्व, जन्मतारीख, जन्मस्थळ इत्यादीची माहिती अर्जात दिलेल्या पद्धतीनेच भरावी.

  • उदा.- आडनाव, पालकांचे नाव, स्वतःचे नाव योग्य रकान्यातच लिहावे. इंग्रजीमध्ये अर्ज भरल्यास तो कॅपिटल लेटरमध्ये भरावा.

  • अर्ज चुकू नये म्हणून सुरवातीला त्याच्या झेरॉक्‍सवर माहिती भरा. त्यानंतर अर्जात ती माहिती भरा. एखादा मुद्दा न कळल्यास मार्गदर्शन घ्या.

  • अर्ज भरायच्या तारखा आणि वेळापत्रकाचे कसोशीने पालन करा.

  • इतर क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या प्रमाणपत्रांच्या अटेस्टेड कॉपी बरोबर ठेवा.

  • काही महाविद्यालयांमध्ये प्रश्‍नावली भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला याच महाविद्यालयामध्ये प्रवेश का हवा, ठराविकच शाखा का, रोल मॉडेल कोण, करिक्‍युलर ऍक्‍टिव्हिटीजबाबत अनेक प्रश्‍न असतात. अशा प्रश्‍नांवरील उत्तरांचा आधीच विचार करून ठेवा.

  • बऱ्याच वेळेला ऑनलाइन अर्जप्रक्रिया पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी संबंधित कागदपत्रे स्कॅन करा. ते पेनड्राइव्हवर सेव्ह करून ठेवा आणि तो आपल्या जवळ बाळगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com