

ICAI CA May 2026 Result Declared
sakal
भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था म्हणजेच Institute of Chartered Accountants of India कडून घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंटसाठीच्या अंतिम परिक्षेचा CA Final May 2026 निकाल जाहीर झाला असून या निकालात महाराष्ट्रातील डोंबिवली पूर्व येथील सोहन अनिल मांजरेकर याने देशात तिसरा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. या यशामुळे मुंबई उपनगरात आणि विशेषतः डोंबिवली परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.