esakal | आयडीबीआय बँक भरती 2021: 80 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा मिळवा पगार
sakal

बोलून बातमी शोधा

IDBI Bank

आयडीबीआय बँक भरती : 80 लाख ते एक कोटीपर्यंतचा मिळवा पगार

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : आयडीबीआय बँकेने (IDBI Bank) कराराच्या आधारे माहिती तंत्रज्ञानाच्या (आयटी) (information technology) प्रमुख पदासाठी अर्ज मागविले आहेत. या पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 16 जून 2021 अशी आहे. या पदासाठी मुंबई, नवी मुंबई येथे नियुक्ती केली जाऊ शकते अथवा अन्य ठिकाणी जेथे बॅंक व्यवस्थापनास उचित वाटेल त्या ठिकाणी नियुक्ती करण्याचा अधिकार बॅंकेने राखून ठेवला आहे. इच्छुक उमेदवारांनी रिक्त स्थानासाठी अर्ज करण्यासाठी बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. (idbi-bank-recruitment-2021-earn-up-to-rs-1-crore-vacancy-open-for-it-professionals)

पात्रता निकष

उमेदवारास आयटी क्षेत्रातील 20 वर्षांचा संपूर्ण कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यापैकी किमान 10 वर्षे वरिष्ठ पातळीवर असावेत, शक्यतो बँक किंवा वित्तीय संस्थेच्या आयटी युनिटमधील अनुभव असावा. इच्छुक उमेदवाराचे अर्ज करण्यासाठी किमान वय 45 वर्षे आणि कमाल 55 वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा मास्टरर्स ऑफ कॉम्प्यूटर अप्लिकेशन या तंत्रज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठातून.

हेही वाचा: महाबळेश्वरच्या रिमझिम पावसात पर्यटकांचा विकेंड लॉकडाउन

कामाचे स्वरूप

अधिकृत अधिसूचनेनुसार बँकेच्या संपूर्ण माहिती तंत्रज्ञान आणि आयटी पायाभूत सुविधांकरिता उमेदवार जबाबदार असतील. त्यात बँकिंग कारवायांचे संपूर्ण उपकरण डिजिटल करणे, सुरक्षा धोक्यांची ओळख पटवणे, प्रणाल्यांच्या विकासाची देखरेख करणे इ.

कार्यकाळ

सध्या हा कालावधी तीन वर्षांचा आहे. जो पाच वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो असे बॅंकेने नमूद केले आहे.

पगार पॅकेज


अंदाजे वार्षिक सीटीसी (कॉस्ट टू कंपनी) 80 लाख ते एक कोटी रुपये.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी बॅंकेच्या recruitment@idbi.co.in येथे अर्ज करावा.
अधिक माहितीसाठी idbibank.in या संकेतस्थळास भेट द्या असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image