
सोलापूर : प्रत्येक कार्यालयात असे काही कर्मचारी असतात जे स्वतः तर काम करत नाहीत, परंतु इतर सहकाऱ्यांना देखील काम करू देत नाहीत. आपण मित्र निवडू शकतो, परंतु ऑफिस व महाविद्यालयातील मित्र निवडणे आपल्या हातात नसते. अशा कामचुकार व टाईमपास करणाऱ्या सहकाऱ्यांपासून सुरक्षित अंतर कसे ठेवावे, हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्याला टाईमपास करणाऱ्या सहकाऱ्यांचे वर्गीकरण करावे लागेल.
बडबड्या सहकाऱ्यांशी करा असा सामना...
अशा प्रकारचे लोक ऑफिसमध्ये सर्वांत गडबड करतात, ज्यांच्याकडे यासारख्या गोष्टींसाठी जणू बाजारच असतो. विश्वातील तत्त्वज्ञान पाझरल्यासारखे त्यांची बडबड सुरू असते की क्वचितच त्यांना शांत केले जाते. ही व्यक्ती एकदा आपल्या डेस्कवर आली की आपली प्रकृती बिघडू लागते. परंतु मूलभूत शिष्टाचारामुळे आपण त्यांना शांत बसवू शकत नाही अन् कामाच्या वेळाच्या शेवटी सायंकाळी आपल्याकडे बरेच पेंडिंग पडल्याचे दिसून येते. ते संभाषणात खूपच कुशल असल्याने लोकांमध्येही ते खूप लोकप्रिय असतात. अशा लोकांना नाकारणे म्हणजे खूप संकोच निर्माण करण्यासारखे असते. परंतु आपल्याला कामाच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावा लागेल, जेव्हा पुढच्या वेळी त्यांचे बोलण्याचे दुकान तुमच्या वर्क स्टेशनकडे येईल तेव्हा त्यांना प्रेमाने गप्प बसवा किंवा त्यांना पाहून आपल्या संगणकात तोंड घालावे. थोडासा धक्का बसलेला आणि अस्वस्थ दिसणे सुरू करा. शेवटी ती व्यक्ती कंटाळून आपला पिच्छा सोडेलच.
नेहमी रडगाणे गाणारे सहकारी आपल्यालाही रडवतील...
या प्रकारचे सहकारी बडबडे व ऑफिसमधील सहकाऱ्यांसमोर रडगाणेच गात बसतात. जेव्हा आपल्यासमोर त्यांच्या दु:खाचा डोंगर कोणी ठेवतो, तेव्हा आपल्याला इच्छा असूनही त्यांचे रडगाणे ऐकावे लागते. त्यांना नाकारू शकत नाही. अशा लोकांचे रडगाणे ऐकत त्यांच्या धाडस निर्माण करण्यात आपला अमूल्य वेळ आपण घालवतो. त्या वेळी राहून गेलेली कामेही शेवटी आपल्यालाच करावी लागतात. कामाचे तर सोडाच हे सहकारी आपल्यामध्ये हळूहळू त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये भरत असतात. अशा सहकाऱ्यांपासून अंतर ठेवलेले बरे असते. कार्यालयीन वेळ चांगला जाण्यासाठी अशा सहकाऱ्यांना प्रेमाने नाहीतर प्रसंगी खडसावून व समजावून सांगून दूर लोटायला हवे.
थोडे जास्तच काम करणारे सहकारी...
आपण म्हणाल की असे सहकारी टाईमपास कसे करू शकतील? करतात ते बिलकुल टाईमपास करतात. काही लोक त्यांच्या कामात फास्ट असतात. त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर ते इतरांशी टाईमपास करायला सुरवात करतात. ज्यांच्याकडे काम कमी असते, त्या प्रत्येकास ज्ञान पाजळत फिरतात. तुमच्या लक्षात आले असेल, की जेव्हा या लोकांकडे काम असते तेव्हा ते कोणाशी तरी क्वचितच बोलतात. तेव्हा अशा सहकाऱ्यांच्या नादी लागून आपल्या कामाचे खोबरे करवून घेऊ नका. आपल्या अक्कलहुशारीने आपला मौल्यवान वेळ वाचवा.
"गॉसिप किंग' किंवा "क्वीन'च्या राज्यात हस्तक्षेप करू नका...
प्रत्येक कार्यालयात काहीतरी गप्पाटप्पा होत असतात. थोड्या गप्पांमुळे कोणतीही हानी होत नाही; परंतु जे लोक संपूर्ण वेळ गॉसिपमध्ये घालवतात ते स्वत:चे कार्य तर करत नाहीत व इतरांनाही काम करू देत नाहीत. ते आपले सहकारी, नोकर, बॉस व फिल्म स्टार्सपासून ते प्रत्येकाच्या जीवनाबद्दल खमंग चर्चा करत असतात. जर तुम्हाला चांगला कर्मचारी व्हायचा असेल तर अशा मनोरंजन करणाऱ्यांपासून दूर राहा. वेळ वाया घालवण्याशिवाय त्यांच्याकडून या गोष्टी घडू शकतात, की ज्याप्रमाणे आपल्याला इतरांच्या जीवनाविषयी मसालेदार बातम्या सांगतात, त्याच प्रकारे उद्या आपल्याही वैयक्तिक जीवनाची लक्तरे पाडून ते इतरांना सांगू शकतात. म्हणजेच वेळेबरोबरच मेंदूचा भुगही यांच्यामुळे होऊ शकतो, हे लक्षात ठेवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.