

Step-by-Step Guide to IIT Hyderabad SURE Internship for Design and Engineering Students
sakal
IIT Hyderabad SURE Internship 2026: उच्च-शिक्षण पूर्ण करत असतानाच बऱ्याचजणांना व्यावहारिक अनुभव घेण्याची इच्छा असते. तुम्हाला पण थोडा अनुभव आणि पैसे कमवण्याची इच्छा आहे का? तर ही सुवर्णसंधी फक्त तुमच्यासाठी आहे! IIT हैदराबाद B.Tech आणि M.Tech विद्यार्थ्यांसाठी SURE इंटर्नशिप 2026 सुरु करत आहे. या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला फक्त अभ्यासाच नाही , तर IIT हैदराबादच्या टॉप फॅकल्टीसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. हा अनुभव तुमच्या शैक्षणिक आणि पुढे जाऊन कामाच्या ठिकाणी खूप फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच तुम्हाल नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी आणि महिन्याला स्टायपेंडही मिळणार आहे.