

IIT Kharagpur to Build India's First Physical AI School
esakal
India's First Physical AI School at IIT Kharagpur: तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात भारताने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. IIT खरगपूर येथे देशातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) स्कूल उभारण्यात येणार असून, याद्वारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च, आंतरविद्याशाखीय शिक्षण (Interdisciplinary Education) आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, यासाठी संस्थेने आपले माजी विद्यार्थी विनोद गुप्ता आणि IIT खरगपूर फाउंडेशन अमेरिका यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केला आहे.
या महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्पाची सविस्तर माहिती आणि देशभरातील इतर प्रमुख शिक्षण संस्थांच्या नवीन AI पॉलिसी खालीलप्रमाणे आहेत-