IIT Student Package : ‘आयआयटीय’न्स झाले कोट्यवधींचे पॅकेजवीर

‘मद्रास’मधील २५, ‘गुवाहाटी’च्या ५ विद्यार्थ्यांना ऑफर
IIT Student Package Education News
IIT Student Package Education News sakal

नवी दिल्ली : देशाच्या अर्थकारणावरील कोरोनाचे सावट दूर होताच रोजगाराची चक्रे देखील वेगाने फिरू लागली असून विविध भागांतील आयआयटीयन्सवरती कोट्यवधी रूपयांच्या पॅकेजचा वर्षाव होऊ लागला आहे. विशेष म्हणजे परकी कंपन्या या भारतीय टॅलेंटला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे.

आयआयटी मद्रासमधील २५ विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून यंदा प्री-प्लेसमेंट ऑफरमध्ये या संस्थेने बाजी मारल्याचे दिसून येते. मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांच्या ऑफरमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘कोरोनानंतर आता प्रथमच कंपन्यांनी समोरासमोर बसून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घ्यायला सुरूवात केली असून त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे,’ असे आयआयटी मद्रासच्या स्टुडंट अकॅडमिक अफेअर विभागाचे सचिव टी.बी.रामकमल यांनी सांगितले. यंदा सर्वाधिक ऑफर आयआयटी मद्रासला मिळाल्या आहेत.

२९० विद्यार्थ्यांना ऑफर

आयआयटी गुवाहाटीमध्ये देखील प्लेसमेंट सुरू झाली असून एका दिवसात ८४ कंपन्यांनी २९० विद्यार्थ्यांना ऑफर लेटर देऊ केले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, क्वांट, कोअर इंजिनिअर, यूएक्स डिझायनर, व्हीएलएसआय, व्हेईकल इंजिनिअरिंग, ॲनालिस्ट, प्रोडक्ट डिझाईनर, जॉब प्रोफाईल्स आदी कंपन्यांकडून भरती करण्यात आली. येथील किमान पाच विद्यार्थ्यांना वार्षिक १ कोटी रूपयांचे पॅकेज मिळाले आहे.

आयआयटी रूरकीची बाजी

आयआयटी रूरकीमधील एका विद्यार्थ्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीकडून एक कोटी रूपयांचे पॅकेज मिळाले असून अन्य एका विद्यार्थ्याला १.३० कोटींचे पॅकेज देशांतर्गत कंपनीने देऊ केले आहे. दहा विद्यार्थ्यांना वार्षिक ८० लाख रूपयांचे पॅकेज मिळाले असल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आयआयटी मद्रासला मिळालेल्या ऑफर

  • १४ - टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स

  • १० - बजाज ऑटो, चेतक टेक

  • ८ - क्वालकॉम

  • ९ - जे.पी. मॉर्गन

  • ७ - प्रोक्टोर अँड गॅम्बल

  • ६ - मॉर्गन स्टॅनले

  • ६ - ग्रॅव्हिटन

  • ५ - मॅकेन्सी अँड कंपनी

  • ५ - कोहेसिटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com