

Preschool Education for Young Children Why Early Childhood Learning Must Become an Important Part of School Education
sakal
-डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय शिक्षणाच्या रचनेत महत्त्वपूर्ण बदल सुचवला आहे. पूर्वीची १०+२ ही रचना बदलून ५+३+३+४ अशी रचना स्वीकारण्यात आली. यातील पहिली पाच वर्षे पायाभूत स्तराची असून, त्यात तीन वर्षांचे अंगणवाडी अथवा बालवाडी शिक्षण आणि इयत्ता पहिली व दुसरी यांचा समावेश होतो. साधारण तीन ते आठ वर्षे हा बालकाच्या शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक-भावनिक विकासाचा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. त्यामुळे ३ ते ६ वयोगटाचा कायद्याने शालेय व्यवस्थेत समावेश करणे ही केवळ प्रशासकीय सुधारणा नसून शिक्षण अधिक समताधिष्ठित आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. ते कसे हे पाहू! या बदलाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक असे तीन प्रमुख पैलू आहेत.