esakal | इम्प्रूव्ह युअरसेल्फ :  प्रवास ध्येय गाठण्याचा...
sakal

बोलून बातमी शोधा

इम्प्रूव्ह युअरसेल्फ :  प्रवास ध्येय गाठण्याचा...

राजकारणाची विशेष आवड असणाऱ्या या व्यक्तीला राजकारणात आपला ठसा उमटवायचा होता. जवळपास मध्यरात्र होत आली होती. आम्ही दोघेच प्रवासी होतो. संभाषणादरम्यान मी अचानक त्यांना एक प्रश्न विचारला.

इम्प्रूव्ह युअरसेल्फ :  प्रवास ध्येय गाठण्याचा...

sakal_logo
By
रमेश सूद, कोच, ट्रेनर, स्टोरी टेलर

हा १९९०च्या‌ दशकाच्या सुरुवातीचा प्रसंग मला आजही आठवतो. नेमके वर्ष, महिना किंवा तारीख मात्र माझ्या लक्षात नाही. तरीही, या दिवशी झालेले संभाषण सदैव माझ्या स्मरणात राहिले आहे. मी माझ्या एका जवळच्या व्यक्तीसोबत प्रवास करत होतो. राजकारणाची विशेष आवड असणाऱ्या या व्यक्तीला राजकारणात आपला ठसा उमटवायचा होता. जवळपास मध्यरात्र होत आली होती. आम्ही दोघेच प्रवासी होतो. संभाषणादरम्यान मी अचानक त्यांना एक प्रश्न विचारला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘तुम्ही मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीच्या एका अशा विशिष्ट टप्प्यावर पोहोचला आहात, की जिथे तुम्ही माझ्या डोक्यावर पाय दिल्यावरच तुमच्या ध्येयापर्यंत पोचू शकता. तुम्हाला माझा पायरीसारखा वापर करावा लागेल. मग अशावेळी तुम्ही काय कराल?’’त्यांनी माझ्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिले. त्यानंतर विचार करून म्हणाले, ‘‘माझे ध्येय गाठण्यासाठी हे आवश्यक असेल, तर मी निश्चितच ते करीन.’ ’त्यामुळे मी आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले, ‘‘खरे तर यामध्ये वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. मी तर सत्य सांगितले. मी माझ्या ध्येयाने अगदी झपाटून गेलोय. प्रत्येक दिवशी मी माझ्या या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची काळजी घेतो. त्याचप्रमाणे तुम्हीही मला तुमचा वापर करू न देण्याची पुरेशी काळजी घ्यायला हवी. ही गोष्ट केवळ माझ्यापुरती मर्यादित नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही घडलेच, तर त्याला तुम्हीसुद्धा जबाबदार असाल. त्यामुळे केवळ मला दोष देण्याचा पर्याय योग्य असू शकत नाही.’’ आयुष्यातील असे काही क्षण संस्मरणीय ठरतात. ते आयुष्यात कधीही, कुठेही घडू शकतात. तुम्हाला काय वाटते?

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

loading image