नववर्षात नोकऱ्यांच्या संधी! कुशल कर्मचाऱ्यांच्या शोधात कंपन्या

नववर्षात वाढतील नोकऱ्यांच्या संधी! कुशल कर्मचाऱ्यांच्या शोधात कंपन्या
jobs
jobssakal
Updated on
Summary

2022 हे वर्ष नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकते.

2022 हे वर्ष नोकरीच्या (Jobs) शोधात असलेल्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकते. Covid-19 महामारीच्या संकटात आर्थिक उलाढालींमध्ये झपाट्याने होणारी वाढ, व्यवसायाच्या महसुलात वाढ झाल्यामुळे कंपन्या सकारात्मक दृष्टिकोनाने पुढे सरसावत आहेत, ज्यामुळे नवीन वर्षात (New Year 2022) रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. कोविड-19 महामारीसाठी जबाबदार असलेल्या कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनवर (Omicron) चिंता वाढली असली तरी, कंपन्यांचा असा विश्वास आहे की बाजारपेठेतील (Market) तेजी नोकऱ्यांसाठी आगामी दिवस महत्त्वाचे व चांगले ठरू शकतात. परंतु त्यासाठी आर्थिक पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेवर Corona महामारीच्या तिसऱ्या लाटेचा फारसा परिणाम होणार नाही हे आवश्‍यक आहे. (In the new year, companies are ready to hire skilled workers)

jobs
पदवीधरांसाठी मेट्रोमध्ये बंपर नोकऱ्या! जाणून घ्या सविस्तर

वर्ष 2020 च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक उलाढाली कोरोना साथीच्या आजाराच्या पहिल्या लाटेमुळे गंभीरपणे प्रभावित झाल्या. याचा जॉब मार्केटच्या (Job Market) औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम झाला. कोरोना साथीच्या आजाराशी संबंधित आव्हाने अद्याप संपलेली नाहीत, परंतु कालांतराने रोजगाराचा दृष्टिकोन आता अधिक सकारात्मक दिसत आहे.

जॉब मार्केटवर लक्ष ठेवणारी कंपनी टीमलीज सर्व्हिसेसचे (TeamLease Services) व्यवसाय प्रमुख (ग्राहक आणि आरोग्य सेवा) ए. बालसुब्रमण्यम (A. Balasubramanyam) हिंदुस्तानशी बोलताना म्हणतात, 'ओमिक्रॉन असो वा नसो, आमच्याकडे पूर्ण लॉकडाउनचे (Lockdown) दिवस संपले यावर विश्वास ठेवण्याची भक्कम कारणे आहेत, मग ते नियोक्ते असोत किंवा सरकारी संस्था. प्रत्येकाला आता जीवन आणि उपजीविका यामध्ये योग्य संतुलन असायला हवे, हे लक्षात आले. कर्मचाऱ्यांचा 'वर्क फ्रॉम ऑफिस' ट्रेंड वेग पकडत आहे आणि कंपन्या त्यांच्या भरती योजनेबद्दल खूप आशावादी आहेत. मजबूत आर्थिक वाढीव्यतिरिक्त, वाढत्या उपभोक्ता पातळीमुळे आणि लसीकरणाच्या (Covid Vaccine) वाढत्या व्याप्तीमुळे देखील हे वेगवान झाले आहे.

SHRM India चे वरिष्ठ सल्लागार नित्य विजयकुमार (Nitya Vijaykumar) म्हणतात, आम्ही खासगी इक्विटी गुंतवणूक (Private equity investment) आणि सौद्यांमध्ये वाढ पाहात आहोत. लसीकरणाचा (Covid Vaccination) वेग जसजसा वाढत जाईल तसतशी कुशल प्रतिभेची कमतरता पाहता, 2022 मध्ये रोजगाराची परिस्थिती उज्ज्वल राहण्याची अपेक्षा आहे. कंपन्या आणि स्टार्टअप्स नवीन भरतीबद्दल (Recruitment) खूप उत्सुक आहेत.

jobs
Paytm वापरत असाल राहा सावध! असा लागतोय हजारो-लाखोंचा चुना

Manpower Group च्या रोजगार दृष्टिकोन सर्व्हेनुसार, नोकरीच्या शक्‍यता जानेवारी-मार्च या तिमाहीत गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च आहे. भारतातील (India) सुमारे 49 टक्के कंपन्या या कालावधीत नवीन भरती करण्याचे नियोजन करत आहेत. या सर्व्हेनुसार, मागील तिमाहीच्या तुलनेत नवीन कर्मचारी भरतीची शक्‍यता पाच टक्‍क्‍यांनी सुधारली आहे. एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीत 46 टक्के वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कुशल कर्मचाऱ्यांना अधिक मागणी राहणार आहे.

मर्कर मेटलचे (Murcur Metal) सीईओ सिद्धार्थ गुप्ता (Siddharth Gupta) म्हणतात, 2022 मध्ये भरतीचा मुख्य मुद्दा तज्ज्ञांच्या भूमिकांचा असेल. योग्य व कुशल कर्मचारी शोधणे ही मुख्य भूमिका असेल. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना साथीच्या आजारादरम्यान मोठ्या प्रमाणावर राजीनामे आणि डिजिटायझेशनच्या प्रक्रियेमुळे कामाची व्याख्या कायमस्वरूपी बदलली आहे. शिवाय, काम केलेल्या तासांच्या आधारे उत्पादनक्षमता मोजण्याचे दिवस देखील गेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com