Mahajyoti : ‘महाज्योती’त दोन हजार जागांची वाढ

महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राचे (महाज्योती) प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना फलदायी ठरत असल्याचे समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे
Increase of two thousand seats in Mahajyoti education
Increase of two thousand seats in Mahajyoti educationSakal
Updated on

Mumbai News : महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राचे (महाज्योती) प्रशिक्षण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना फलदायी ठरत असल्याचे समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे; मात्र, जागा अपुऱ्या असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळत नव्हती.

मात्र, गेले कित्येक दिवस पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात जागावाढ होत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याची घोषणा पोकळ ठरते की काय, अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. ही बाब लक्षात घेऊन महाज्योतीच्या संचालक मंडळाने तब्बल २,२५० जागा वाढविण्यास नुकतीच मान्यता दिली.

याबाबतची माहिती ओबीसी खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी दिली. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राद्वारे (महाज्योती) प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते.

बहुजन कल्याण विभागाअंतर्गत ही संस्था कार्यरत आहे. विद्यार्थ्यांनी जागा वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जागा वाढविण्याचा प्रस्ताव ‘महाज्योती’समोर आला होता. यूपीएससी प्रशिक्षणासाठी मुंबईत ५०० तर पुणे ७५० जागा, एमपीएससी प्रशिक्षणासाठी ५०० जागा, एमपीएससी संयुक्त प्रशिक्षणासाठी ५०० जागा, लष्कर भरती प्रशिक्षणासाठी ७५० जागा वाढविण्यास मान्यता दिली आहे.

जागांची सद्य:स्थिती

  • पूर्वीच्या जागा : ४५००

  • वाढलेल्या जागा : २,२५०

  • एकूण जागा : ६,७५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com