हवाई दलात 10 वी, 12 वी पास झालेल्यांसाठी नोकरी, MTSसह अनेक पदांसाठी करा अर्ज

भारतीय हवाई दलाने ग्रुप सी नागरी श्रेणीतील पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
Indian Air Force
Indian Air Forceesakal
Summary

भारतीय हवाई दलाने ग्रुप सी नागरी श्रेणीतील पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Indian Air Force Bharti 2022 : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सरकारी नोकरी (Job) करण्याची संधी आहे. भारतीय हवाई दलाने ग्रुप सी नागरी श्रेणीतील पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ग्रुप 'सी सिविलियन' श्रेणीअंतर्गत हाऊस कीपिंग स्टाफ, कुक, सुतार, मल्टी टास्किंग स्टाफ आणि हिंदी टायपिस्ट अशा पदांसाठी हवाई दल भरती करणार आहे.

Indian Air Force
रेल्वेत 10 वी, पदवीधरांना परीक्षेशिवाय नोकरी! अर्ज दाखल करण्यास सुरवात

या नोटीसनुसार, हाऊस किपिंग स्टाफ, कुक, सुतार आणि एमटीएस या पदांवरील भरती एअरफोर्स स्टेशन आणि एअरफोर्स हॉस्पिटल्समध्ये होणार आहे. तर हिंदी टंकलेखकांची भरती सीएएसबी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. भारतीय हवाई दल गट क नागरी भरती 2022 साठी भरतीची जाहिरात जारी झाल्यापासून ३० दिवसांच्या आत अर्ज करावा लागतो.

भारतीय हवाई दल ग्रुप सी नागरी भरती 2022 चा तपशील

- हाउस किपिंग स्टाफ- 1 पद

- मल्टी टास्किंग स्टाफ - 1 पद

- कुक - 1 पद

- सुतार - 1 पद

- हिंदी टंकलेखक - 1 पद

Indian Air Force
CISF भरती : 12 वी पास उमेदवारांसाठी विना परीक्षा नोकरी मिळवण्याची संधी

भारतीय हवाई दल ग्रुप सी नागरी भरती 2022 साठी पात्रता

- मल्टी टास्किंग स्टाफ - दहावी पास असणे आवश्यक

- हाऊस किपिंग स्टाफ - दहावी पास असणे आवश्यक

- सुतार- दहावी पास असलेल्या कारपेंटर ट्रेडमध्ये आयटीआय केले असावे.

- कूक- दहावी पास आणि एक वर्षाचा अनुभव असलेले कॅटरिंगचे प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.

- हिंदी टायपिस्ट- बारावी पास असलेल्या कम्प्युटरवर हिंदीत 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट असा टायपिंगचा वेग.

भारतीय हवाई दल ग्रुप सी नागरी भरती 2022 साठी वयोमर्यादा

- सर्वसाधारण वर्ग - 18 ते 25 वर्षे

- ओबीसी - 18 ते 28 वर्षे

- एससी आणि एसटी - 18 ते 30 वर्षे

भारतीय हवाई दल ग्रुप सी नागरी भरती 2022 मध्ये निवड प्रक्रिया

भारतीय वायुसेना ग्रुप सी नागरी प्रवर्गाच्या पदांवरील भरती लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.

अर्ज कसा करावा

भारतीय हवाई दलात ग्रुप सी नागरी श्रेणीतील पदांवर भरतीसाठीचा अर्ज ऑफलाईन करायचा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com