Indian Army Internship 2026: डिफेन्स सेक्टरमध्ये करिअरची सुवर्णसंधी! ७५ दिवसांची इंटर्नशिप; ७५ हजार रुपये स्टायपेंड...

Career in Defence Sector: भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडतर्फे २०२६-२७ या सत्रासाठी इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे...पाहा सविस्तर माहिती
Indian Army 75-Day Internship 2026 Apply Now, Get Rs 75,000

Indian Army 75-Day Internship 2026: Apply Now, Get Rs 75,000

esakal 

Updated on: 

Indian Army 75-Day Internship: संरक्षण क्षेत्रात (Defence Sector) करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याच्या 'नॉर्दर्न कमांड'तर्फे वर्ष २०२६-२७ साठी ७५ दिवसांच्या विशेष इंटर्नशिप कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश देशातील होतकरू तरुणांना लष्कराच्या आधुनिकीकरणात योगदान देण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान मिळवून देणे हा आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या इंटर्नशिपसाठी ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान निवडक उमेदवारांना ७५,००० रुपयांचे आकर्षक स्टायपेंड देखील दिले जाणार आहे. या इंटर्नशिपचे स्वरूप, प्रशिक्षण केंद्रे आणि अर्ज प्रक्रियेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...