
Indian Coast Guard : दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी
मुंबई : इंडियन कोस्ट गार्ड (ICG) ने एमटी ड्रायव्हरसह ग्रुप सी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. एमटी ड्रायव्हर, स्टोअर कीपर, सुतार आणि शीट मेटल वर्करच्या एकूण 11 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट indiancoastguard.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२२ आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. (Indian Coast Guard Recruitment 2022)
रिक्त जागांचा तपशील
एकूण पदे- 11
महत्त्वाची तारीख
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख – 10 सप्टेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर 2022
वय मर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
शैक्षणिक पात्रता
भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे 10वी, 12वी आणि ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे दिली जाते.
पगार
भारतीय तटरक्षक दलाच्या सर्व पदांसाठी वेगवेगळे वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 25,000 रुपये वेतन दिले जाईल.