Indian Navy Recruitment 2022 | नौदलात मुलाखतीविना १०वी उत्तीर्णांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy Recruitment 2022

Indian Navy Recruitment 2022 : नौदलात मुलाखतीविना १०वी उत्तीर्णांची भरती

मुंबई : भारतीय नौदलाने ग्रुप सी च्या ट्रेड्समन मेटच्या पदांवर भरती सुरू केली आहे. ही भरती अंदमान आणि निकोबार कमांडच्या विविध युनिट्ससाठी केली जाईल ज्या अंतर्गत ११२ पदे भरली जातील.

भारतीय नौदलात नोकरीसाठी इच्छुक असलेले सर्व उमेदवार erecruitment.andaman.gov.in किंवा andaman.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांच्या भरतीसाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. (Indian Navy Tradesman Recruitment 2022)

हेही वाचा: IBPS Recruitment : ६ बँकांमध्ये हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू

अर्ज प्रक्रिया सुरू - ६ ऑगस्ट २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - ६ सप्टेंबर २०२२

वय मर्यादा

भारतीय नौदलातील या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गाला नियमानुसार वयात सवलत दिली जाईल याची नोंद घ्यावी.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच मान्यताप्राप्त संस्थेचे ITI पास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पगार

रु. १८ हजार ते ५६ हजार ९००

हेही वाचा: UPSC : ४ भावंडांनी उत्तीर्ण केली यूपीएससी; आता आहेत IAS आणि IPS

असा करा अर्ज

१. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट erecruitment.andaman.gov.in वर जा.

२. वेबसाइटच्या मुखपृष्ठावरील ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.

३. लिंकवर क्लिक केल्यानंतर ट्रेड्समन मेट, मुख्यालय, अंदमान आणि निकोबार कमांडच्या पदासाठी भर्ती वर क्लिक करा.

४. त्यानंतर तुमचा अर्ज भरा आणि सर्व आवश्यक तपशील अपलोड करा.

५. फॉर्म पूर्ण झाल्यानंतर, पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

Web Title: Indian Navy Recruitment 2022 Recruitment Of 10th Pass Without Interview In Navy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..