Indian Oil JE Recruitment 2022: ज्युनियर इंजिनिअरच्या अनेक पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Oil JE Recruitment 2022 various positions for Junior engineer find out the information and apply

Indian Oil : ज्युनियर इंजिनिअरच्या अनेक पदांसाठी भरती, अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

Indian Oil JE Recruitment 2022: चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) ने ज्युनियर इंजीनिअरच्या विविध पदांसाठी भारतीयांना अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 मार्च2022 पासून सुरू होत आहे. उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट https://cpcl.co.in/ वर 14 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

ज्युनियर इंजीनिअर पदासाठी (Indian Oil Recruitment 2022 Number of Posts) एकूण 72 रिक्त जागांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार त्यांच्या पात्रतेनुसार निश्चित केलेल्या शेवटच्या तारखेपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. (Indian Oil JE Recruitment 2022 various positions for Junior engineer find out the information and apply)

हेही वाचा: पुणे : ‘आरटीई’ जागांसाठी लवकरच सोडत

Indian Oil JE Recruitment 2022 Eligibility Criteria:: शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेशी संबंधित विषयातील तीन वर्षांचा डिप्लोमा असावा. अधिक शैक्षणिक पात्रता माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात.

Indian Oil JE Recruitment 2022 Age Limit: वयोमर्यादा

अर्जदाराचे वय 26 ते 30 वर्षे दरम्यान असावे. अर्जदारांचे वय 1 फेब्रुवारी 2022 पासून मोजले जाईल. OBC वर्गातील अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा 3 वर्षे आणि SC आणि ST वर्गातील अर्जदारांसाठी 5 वर्षे आहे.

Indian Oil JE Recruitment 2022 Application Fee: अर्ज शुल्क

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000 अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी आणि एसटी वर्गातील अर्जदारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा: Bank of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी भरती, परीक्षेशिवाय नोकरीची संधी

Indian Oil JE Recruitment 2022 Selection Process: निवड प्रक्रिया

JE च्या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय फिटनेस अंतर्गत केली जाईल. परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटवर जारी केले जाईल.

Indian Oil JE Recruitment 2022 Important Dates: या तारखा महत्त्वाच्या

अर्ज सुरू होण्याची तारीख - 24 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 एप्रिल 2022

प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - 2 मे 2022 (संभाव्य)

परीक्षेची तारीख - 8 मे 2022 (संभाव्य)

Web Title: Indian Oil Recruitment For Junior Engineer Posts Know The Application Process

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaOil
go to top