रेल्वेत 3 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; 10 वी विद्यार्थीही करु शकतात अर्ज

Indian Railway Recruitment 2022
Indian Railway Recruitment 2022esakal
Summary

सरकारी नोकरी मिळवणं हे तरुणांचं स्वप्न असतं.

Indian Railway Jobs : सरकारी नोकरी (Government Job) मिळवणं हे तरुणांचं स्वप्न असतं. तरुणांची रेल्वेत नोकरी करण्यासाठी पहिली पसंती असते. सध्या रेल्वेत विविध पदांसाठी भरती सुरुय. दरम्यान, रेल्वेअंतर्गत शिकाऊ पदांसाठी तीन हजारांहून अधिक जागांची भरती केली जाणार आहे. या नोकऱ्यांकरता अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. मध्य रेल्वेत शिकाऊ पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला rrccr.com भेट द्यावी लागेल. रेल्वेनं 2422 पदांवर नोकऱ्या जाहीर केल्या आहेत, तर ईस्ट कोस्ट रेल्वे 700 हून अधिक पदांवर भरती करणार आहे. (Indian Railway Recruitment 2022)

रेल्वे भरती सेल (RRC) मध्य प्रदेशनं (Railway Recruitment Cell Madhya Pradesh) ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण 2422 रिक्त जागांवर पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याअंतर्गत मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर विभागात उमेदवारांची भरती केली जाणार आहे. उद्या 16 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. उमेदवारांकडं संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसेच किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणंही गरजेचं आहे. अर्जासाठी वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे निश्चित करण्यात आलीय. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी यात सूट देण्याची तरतूद आहे.

Indian Railway Recruitment 2022
Bank Jobs 2022: या आठवड्यात होणार बँकमध्ये बंपर भरती, असा करा अर्ज

17 जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 16 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. यात सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. याशिवाय, आरक्षित प्रवर्गासाठी अर्ज मोफत आहे. तर ईस्ट कोस्ट रेल्वेनं (East Coast Railway) प्रशिक्षणार्थी पदांच्या 700 हून अधिक रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज विंडो उघडलीय. यामध्ये इच्छुक उमेदवार रेल्वे भरती सेल, भुवनेश्वर - rrcbbs.org.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com