

Reskilling Fund Benefits After Layoff | Employee Financial Relief
sakal
Employee Financial Relief: कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या नव्या सुधारणांचा थेट परिणाम कर्मचारी आणि उद्योगविश्वावर होणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या औद्योगिक संबंध संहिता २०२० (Industrial Relations Code, 2020) अंतर्गत कामगार कायद्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांचा उद्देश उद्योगांना अधिक लवचिक बनवणे आणि त्याच वेळी कर्मचाऱ्यांना योग्य आणि आवश्यक संरक्षण देणे हा आहे. नोकरी, कपात, कामगार संघटना आणि तक्रार निवारणाशी संबंधित नियम आता अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत.