मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

न्यूनगंड आणि सोशल फोबिया यांवर मात करून आत्मविश्वास वाढवणे शक्य आहे, फक्त योग्य दृष्टिकोन आणि सराव आवश्यक.
मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

मानसवेध : माझ्यात काहीतरी कमी आहे?

sakal

Updated on

डॉ. विद्याधर बापट, मानस तज्ज्ञ

अशोक एका मोठ्या कंपनीत बरेच महिने काम करत होता. कामामध्ये अतिशय प्रवीण होता. अनेकदा त्याला प्रेझेंटेशन द्यायची वेळ येई किंवा एखाद्या मोठ्या समूहासमोर बोलण्याची वेळ येई, त्यावेळी मात्र त्याला विलक्षण भीती वाटत असे. हात पाय कापत असत. तोंडाला कोरड पडत असे. शक्यतो तो असे प्रसंग टाळत असे. तथापि, नव्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं पोस्टिंग झालं आणि लोकांसमोर बोलणं कामाचा भाग म्हणून क्रमप्राप्त झालं. अशोकनं चक्क आजारपणाची रजा काढली. त्या रजेचा अवधी आता संपत आला होता. त्याच्यासमोर दोनच पर्याय होते. कामावर जॉईन होऊन समूहासमोर तोंड देणं म्हणजेच यशस्वीरीत्या समूहासमोर बोलणं किंवा नोकरी सोडणं. न्यूनगंड आणि दुबळी आत्मप्रतिमा असलेल्या अशोकनं दुसरा पर्याय स्वीकारला. खरं तर हा शुद्ध आत्मघात होता. राजीनामा द्यायच्या आदल्या दिवशी प्रतिभा त्याची पत्नी त्याला शेवटचा प्रयत्न म्हणून माझ्याकडे घेऊन आली होती. अशोकमध्ये कॉम्प्लेक्सेसचं क्लस्टर होतं. न्यूनगंड होता, सोशल फोबिया होता. इतक्या हुशार तरुणाचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य झाकोळून गेलं होतं. पणाला लागलं होतं. समूहासमोर बोलण्याचं भय हा न्यूनगंड आणि सोशल फोबियाचा एक भाग होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com