सर्वांगीण विकासासाठी अभिनव शिक्षणपद्धती (श्री श्री रविशंकरजी)

श्री श्री रविशंकरजी
Wednesday, 18 December 2019

शालेय शिक्षण हे तणावपूर्ण न वाटता ते आनंददायी असावे, या दृष्टिकोनातून श्री श्री रविशंकर विद्यामंदिरची स्थापना करण्यात आली. पुण्यात कोथरूड, हडपसर, वारजे, भूगाव, मोशी तसेच भारतात व भारताबाहेरील शाळांमार्फत ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य अविरत सुरू आहे. समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी ही संस्था पुढाकार घेत आहे.

‘शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मूल जन्माला आल्यापासून त्याने कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा यांवर चर्चा सुरू होते. मुळात मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन मुलांपेक्षा पालकांनाच जास्त असते. शिक्षण हे ओझे किंवा टेन्शन नसून ती एक आनंद देणारी प्रक्रिया आहे. याच संकल्पनेनुसार मुलांना शिक्षण सोपे करून सांगणे व त्यांच्यावर चांगले संस्कार करणे यासाठी नेहमीच श्री श्री रविशंकर विद्यामंदिर सतत प्रयत्नशील असते,’’ असे मत शाळेच्या संचालिका शुभांगी करवीर यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एसएसआरव्हीएमच्या शाळेत समाजातील आदिवासी, ग्रामीण भागाप्रमाणेच तसेच शहरांमधील विद्यार्थीही असतात. देशभरातील १०० हून अधिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देशभरातील मुलांना देण्याचा शाळेचा प्रयत्न आहे. एसएसव्हीआरएम ट्रस्टच्या शाळेत विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा पूर्ण विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण देण्यात येते. एकात्मिक मूल्यशिक्षणाद्वारे चांगल्या समाजाची निर्मिती करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये शिस्त, ध्यानधारणा, संस्कृत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम आणि खेळ या माध्यमातून मूल्याधारित शिक्षण देण्यात येते. अशी माहिती श्री श्री रविशंकर विद्यामंदिर मोशी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजा हिनवार यांनी दिली.
 
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासक्रम

  • स्वतंत्र व आनंददायी वातावरण 
  • स्वयंशिक्षण पद्धतीमुळे जीवनकौशल्ये आणि नेतृत्वगुणांचा विकास 
  • श्री श्री शिक्षक प्रशिक्षण अकादमीत विशेष प्रशिक्षण घेतलेले शिक्षक.
  • ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान, सत्संग, संस्कृत, योगा, तायक्वांदो, खेळ, नृत्य, संगीत आणि कला यांसारखे इतर शालाबाह्य अभ्यासक्रम 
  • अन्य शाळांमधील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाबाबत प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते.
  • विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधून परिपुर्ण शिक्षण 
  • बुद्धीमान पिढी घडविण्याबरोबरच कलागुणसंपन्न आदर्श पिढी तयार करणे 
  • मुलांना शारीरिकदृष्ट्या सशक्त करण्याबरोबरच, मानसिकदृष्ट्या जागरूक करणे, भावनिक व अध्यात्मिक  समतोल विकास असणारा पाया तयार करणे.
  • विद्यार्थ्यांना विविध प्रदर्शने, नाटक यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शिक्षणाचा एक भाग म्हणून विविध अभ्यासविषयक प्रकल्पांवर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येते.

प्रशिक्षित शिक्षक 
शाळेतील शिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंगचे अभ्यासक्रम पुर्ण करतात, त्यातील साधनाही करतात त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट त्यांना उत्तमरीत्या जमते. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा व ताण समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

शाळेतील अन्य उपक्रम 
वार्षिक स्नेहसंमेलन, खेळ, विविध स्पर्धा, प्रदर्शने, कार्यशाळा यांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कौशल्य दाखविण्याची संधी तर मिळतेच शिवाय त्यांच्यातील आत्मविश्‍वास विकसित होण्यास मदत होते. 

शाळाबाह्य उपक्रमांमुळे विद्यार्थी टीम वर्क, नियोजन, व्यवस्थापन करण्यास शिकतात.

अनुभवातून शिक्षण  
अनुभवातून शिक्षण देण्यावर शाळेत भर देण्यात येतो. त्यासाठी केवळ घोकंपट्टी करण्यापेक्षा पुस्तकातील धडे प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शिकविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ते शिकत असलेल्या संकल्पनांचा पाया रुजतो. आमच्या या पद्धतीमुळे विद्यार्थी मन, शरीर आणि भावना या दृष्टीने सशक्त होण्यास मदत होते. 

बक्षिसे 
अबॅकस, ऑलिंपियाड परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा यांसारख्या माध्यमातून शाळेला अनेक बक्षिसे मिळाली आहेत.

प्रत्येक पालकास असे मूल हवे आहे, की ते जिथे जाईल तिथे त्याचे व्यक्तिमत्त्व चमकेल. अशा व्यक्तिमत्त्वाचे सर्वत्र कौतुक केले जाते. असे आनंदायक व्यक्तिमत्त्व हेच या शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
- श्री श्री रविशंकरजी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Innovative education system for holistic development Shri Shri Ravishankarji