

Pragya Vikasacha Rajmarg: INSPIRE-SHE Scholarship for Higher Education in Science by Jaywant Borse
Sakal
जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या आणि विज्ञानाची आवड असणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ‘इन्स्पायर स्कॉलरशिप’ (INSPIRE Scholarship for Higher Education) दिली जाते. या योजनेंतर्गत विविध घटकांच्या माध्यमातून, गुणवंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय स्तरावर मूलभूत आणि नैसर्गिक विज्ञानांचा अभ्यास करण्यासाठी आणि संशोधन कारकीर्द घडविण्यासाठी हा एक उपक्रम आहे.