
Marathi Woman Youtuber : स्वयंपाकघरातून थेट युट्युब पर्यंतचा प्रवास करणाऱ्या सुमन धामणे म्हणजेच 'आपली आज्जी' ह्या केवळ एक यूट्यूब स्टार नाहीत, तर हजारो महिलांसाठी प्रेरणेचं मूर्तिमंत उदाहरण ठरल्या आहेत. कॅमेऱ्याची भीती, तांत्रिक अडचणी, अगदी एका टप्प्यावर चॅनेल हॅक होण्यासारखी धक्कादायक घटना यांचा सामना करत त्यांने स्वतःच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर डिजिटल यश मिळवलं. आज तिच्या हातच्या पारंपरिक चवांनी यूट्यूबवर लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली असून, ‘Silver Play Button’ हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.