IB Recruitment 2023: १०वी उत्तीर्णांना थेट गुप्तचर विभागात सरकारी नोकरी; ७० हजारांपर्यंत पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IB Recruitment 2023

IB Recruitment 2023: १०वी उत्तीर्णांना थेट गुप्तचर विभागात सरकारी नोकरी; ७० हजारांपर्यंत पगार

मुंबई : Intelligence Bureauने सुरक्षा सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. या भरतीतून एकूण १ हजार ६७५ पदे भरली जाणार आहेत. (IB Recruitment 2023)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार IB च्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in किंवा ncs.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे. (IB Vacancy 2023) हेही वाचा - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार ?

हेही वाचा: LIC Job : एलआयसीमध्ये ९ हजार जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे – १,६७५

सुरक्षा सहाय्यक - १५२५ पदे

MTS - १५० पदे

महत्त्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २८ जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १७ फेब्रुवारी २०२३

शैक्षणिक पात्रता

IB च्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेचे मॅट्रिक म्हणजेच १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

हेही वाचा: Army Recruitment : वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची संधी

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून ५० रुपये भरावे लागतील. यासोबतच ४५० रुपये भरती प्रक्रिया शुल्क म्हणून भरावे लागणार आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना टियर १ आणि टियर २ परीक्षा द्यावी लागेल. टियर १ ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल, तर टियर २ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल.

पगार

सुरक्षा सहाय्यक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर ३ नुसार २१ हजार ७०० रुपये ते ६९ हजार १०० रुपये वेतन दिले जाईल. दुसरीकडे, MTS पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये दिले जातील.